लंडन – ब्रिटनमधील बर्मिंगहम शहरातील मल्टिप्लेक्समध्ये एका मुस्लिम तरुणाने ‘द केरला स्टोरी’ला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रोपगंडा असल्याचे म्हणत गोंधळ घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रिटनमध्ये ‘द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, १९ मे रोजी हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र, ब्रिटनमधील या चित्रपाटाचा शो सुरू असताना शकील अफसर नावाच्या मुस्लिम तरुणाने मध्येच उठून या गोंधळ घातला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तो मोठमोठ्याने ओरडत चित्रपट पहाण्यास आलेल्या प्रेक्षकांना धमकावताना आणि ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे भाजप आणि आरएसएस प्रोपगंडा असल्याचे म्हणताना दिसत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबाबतीतही आक्षेपार्ह बोलत आहे. हा चित्रपट खोटा आहे, आम्ही हे सहन करणार नाही, हा चित्रपट फूट पाडण्यासाठी काढण्यात आला आहे.” असेही तो ओरडतो आहे. चित्रपटगृहाविरोधातही त्याने घोषणा दिल्या. सुरुवातीला चित्रपटगृहात उपस्थित असलेले प्रेक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, पण “हा एक इस्लामोफोबिक चित्रपट आहे, तुम्हाला हा चित्रपट पाहताना लाज कशी वाटत नाही?” असे तो म्हणू लागला तेव्हा प्रेक्षकांनी उठून याला विरोध करायला सुरुवात केली. काही वेळाने चित्रपटगृहाच्या मालकांनी या तरुणाला बाहेर काढले, तेव्हा जाताना त्याने ‘फ्री काश्मीर’च्या घोषणाही दिल्या.