नवी दिल्ली – ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार (बाफ्टा) २०२५ जाहीर झाले असून ‘कॉनक्लेव्ह’ हा ब्रिटश चित्रपट अव्वल ठरला आहे. भारतातून पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या चित्रपटाला इंग्रजी व्यतिरिक्त भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार स्पॅनिश चित्रपट एमिलिया पेरेझला मिळाला.ऑल वी इमॅजिन अॅज लाईट हा या पुरस्कारासाठी नामांकन झालेला ७ वा भारतीय चित्रपट आहे. मागील दहा वर्षांत द लंचबॉक्सनंतर बाफ्टासाठी नामांकन मिळालेला हा पहिला चित्रपट होता.चित्रपटाची कथा एका नर्सच्या जीवनावर आधारित आहे. ही परिचारिका बऱ्याच वर्षांपासून पतीपासून वेगळी राहात असते. अचानक एके दिवशी तिला तिच्या पतीकडून एक भेट मिळते. येथून तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते,अशी ही कथा आहे.
‘बाफ्टा पुरस्कार-२०२५’ जाहीर’कॉनक्लेव्ह’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
