पुणे – जानेवारीच्या अखेरच्या दिवसापासून पुणे मेट्रो सेवा प्रवाशांसाठी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉरवरील शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटते. मात्र हा वेळ एक तासाने वाढवण्यात आल्यामुळे हजारो पुणेकरांना फायदा होणार आहे. रात्री वाढत्या प्रवासी संख्या लक्षात घेऊन वेळ वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. तिला प्रतिसाद म्हणून पुणे मेट्रोने आता सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १० वाजल्यानंतर प्रत्येक मार्गावर १० मिनिटांच्या अंतराने ६ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |