पणजी – मांडवी नदीवरील जुना पूल १५ फेब्रुवारीपासून दुरुस्तीच्या कामासाठी १ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे. ज्यामुळे वाहतूक नवीन मांडवी पुलावर वळवली आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जुना मांडवी पूल बंद असल्याने, ज्या पालकांची मुले बारावीची परीक्षा देत आहेत त्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी घरातून लवकर बाहेर पडावे. दुचाकी वाहनांव्यतिरिक्त पर्वरीतून फोंडा, बांबोळी आणि दक्षिण गोवा येथे जाणाऱ्या वाहनचालकांनी अटल सेतूचा वापर करावा जेणेकरून नवीन मांडवी पुलावरील गर्दी कमी होईल.
जुना मांडवी पूल वाहतुकीसाठी बंद
