वॉशिंग्टन – अमेरिकन काँग्रेसच्या सभागृहात भारतीय वंशाचे खासदार सुहास सुब्रमण्यम यांनी हातात भगवद्गीता घेऊन खासदारकीची शपथ घेतली. अशा प्रकारे भगवदगीता घेऊन शपथ घेणारे ते आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे खासदार आहेत. या आधी २०१३ साली तुलसी गॅबर्ड यांनी भगवद्गीता घेऊन शपथ घेतली होती.शपथ घेतल्यानंतर सुब्रमण्यम म्हणाले की, मी वर्जिनिया मधील पहिला भारतीय अमेरिकन खासदार आहे. वर्जिनिया या मतदारसंघातून या आधी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे निवडून येत होते.अमेरिकेत २०१३ साली पहिल्यांदा हातात भगवद्गीता घेऊन शपथ घेणाऱ्या तुलसी गॅबार्ड यांची अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेच्या संचालक पदावर नेमणूक झाली आहे. अमेरिकन संसदेत ख्रिस्ती खासदार बहुसंख्य असून सध्या तिथे चार भारतीय हिंदू खासदार आहेत. राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना व श्री ठाणेकर हे तीन खासदार आहेत.
अमेरिकेन खासदाराने घेतली भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-08-at-11.01.38-AM.jpg)