शिमला – पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.५० देशांतील १३० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत.गेल्या वर्षी बीर-बिलिंग येथे पॅराग्लायडिंग अॅक्युरसी प्री-वर्ल्ड कप आणि पॅराग्लायडिंग क्रॉस-कंट्री प्री-वर्ल्ड कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर आता पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनने येथे पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास मंजुरी दिली आहे.या विश्वचषक स्पर्धेला फेडरेशन एरोनॉटीक इंटरनॅशनलने (एफएआय) ग्रेड २ इव्हेंट असा दर्जा दिला आहे.एअरो क्लब ऑफ इंडियानेही या स्पर्धेला मान्यता दिली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |