नवी दिल्ली – अजमेर शरीफ दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याच्या दाव्यावरुन वाद सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अजमेर शरीफ दर्ग्याच्या उरूसासाठी चादर पाठवली आहे.देशातील अनेक दर्गे व मशीदींच्या खाली प्राचीन मंदिरे असल्याचे वाद सध्या सुरु आहेत. अजमेर शरीफ दर्ग्यांच्या बाबतीतही हा वाद सुरु असताना पंतप्रधानांनी दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडे त्यांनी ही चादर सोपवली आहे. हे दोघेही नेते आता अजमेरला जाऊन ही चादर चढवणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदींनी गेल्या सलग ११ वर्ष या दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे. गेल्यावर्षी जमाल सिद्दीकी यांच्या बरोबर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या चादर चढवण्यासाठी गेल्या होत्या.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |