मुंबई- देशात दोन हजारांच्या नोटा बंद करुन दीड वर्ष झाली आहेत.दोन हजारांच्या नोटा परत घेण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदत दिली होती,या काळात मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत.तरीही अजूनही पूर्ण नोटा आरबीआयकडे आलेल्या नाहीत.आतापर्यंत बँकेकडे ९८.१२ टक्के नोटा परत आल्या आहेत.अजूनही बाहेर लोकांकडे ६,६९१ कोटी रुपयांच्या नोटा आहेत.या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली.
१९ मे २००३ मध्ये रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली.त्यावेळी व्यवहारात साधारणपणे ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या.आता फक्त ६,६९१ कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत.७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँक शाखेत या नोटा परत करता येत होत्या. त्यानंतर रिझर्व बँकेच्या १९ कार्यालयामध्ये या नोटा परत करता येत आहेत. कोणत्याही पोस्ट कार्यालयातून नागरिक या नोटा रिझर्व बँकेच्या संबंधित कार्यालयाकडे पाठवू शकतात.केंद्र सरकारने नोटबंदीनंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजार रुपयाची नोट सुरू केली होती. त्या अगोदर १,००० आणि ५०० रुपयाची जुनी नोट बंद करण्यात आली होती. उरलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा लवकरच परत येतील असे रिझर्व बँकेने म्हटले आहे.