१७ नोव्हेंबरपासून चार दिवस आकाशात होणार ‘उल्कावर्षाव’

अमरावती – नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे.येत्या १७ ते २० नोव्हेंबरमध्ये सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता जास्त राहील. त्यामुळे आकाशात चार दिवस आतषबाजी पहायला मिळणार आहे. या उल्कावर्षावाची तिव्रता आणि निश्चित वेळ मात्र खात्रीने सांगता येत नाही.

या उल्का वर्षावाला ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असतांना एकाद्यावेळी क्षणार्धात एकादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते या घटनेस तारा तुटणे असे म्हणतात.ही एक खगोलीय घटना आहे.एखाद्यावेळी उल्का आपल्याला पडताना दिसते,या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहे. परंतू अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सुर्याला भेट देतो.तरी सर्व खगोलप्रेमिंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य पाहावे,असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

दरम्यान,धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असतांना त्यातील काही भाग मोकळा होतो, धुमकेतूने मागे टाकलेले ते अवशेष असतात. या उल्का एकाद्या तारका समुहातून येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्यापेक्षा जास्त उल्का आकाशातील एकाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात.काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरुप अवस्थेत पृथ्वीवर येतात, त्यास ‘अशणी’ म्हणतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top