शिमला – हिमाचल प्रदेशमधील जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आले असून पूराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, मंडी, शिमला, शिरमौर, कुन्नुर या जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे राज्यातील १०० पेक्षा अधिक मार्ग व काही राष्ट्रीय महामार्गही बंद झाले. राष्ट्रीय महामार्ग ७०७, मार्ग बंद असून शिमला, मंडी कांगाल व कुल्लु जिल्ह्यातील ५५ पेक्षा अधिक रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. स्पिती, उना जिल्ह्यातील रस्त्यांबरोबरच राज्यातील ४२७ वीज निर्मिती केंद्रेही बंद पडली आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |