पुणे – पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बंद अवस्थेतील बसमध्ये २५ फेब्रुवारीला २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर नादुरुस्त बसचा विषय ऐरणीवर आला होता. त्यामुळे डेपोतील जुन्या आणि नादुरुस्त ७२ शिवशाही आणि शिवनेरी बस आता भंगारात काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे.
पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात शिवशाही आणि शिवनेरी बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली गेली असून बसमधील साहित्याची चोरीदेखील होत आहे. या बसेसचा लिलाव २१ मार्च रोजी होणार आहे. या लिलावातून एसटी महामंडळाला अडीच ते तीन कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे.
स्वारगेटमधील ७२ शिवशाही बस भंगारात काढणार
