सोलापूर
सोलापूर कृषी बाजारासह अनेक बाजारात लाल कांद्याची आवक वाढली. सोलापूर कृषी बाजारात आज लाल कांद्याची ४४ हजार क्विंटल आणि लासलगाव कृषी बाजारात १७ हजार क्विंटल आवक झाली.लाल कांद्याला कमीत कमी १७५० ते २५०० रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर नागपूर बाजारात उन्हाळ कांद्याला २२०० रुपये दर मिळाला.
सोलापूर बाजारात लाल कांद्याला १९०० रुपये,बारामती बाजारात २८०० रुपये, येवला बाजारात २१५० रुपये, लासलगाव बाजारात २५०० रुपये, नागपूर बाजारात २५०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात २३०० रुपये दर मिळाला. तर कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये २२५० रुपये, पुणे-पिंपरी बाजारात २५०० रुपये, मंगळवेढा बाजारात २८०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २४०० रुपये दर मिळाला.