मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज निराशाजनक वातावरण होते.बाजार दिवसभर घसरणीसह व्यवहार करत होता.दिवसाअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१२ अंकांनी आपटला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीचीही ४२ अंकांनी घसरण झाली.सेन्सेक्स ३१२ अंकांच्या घसरणीसह ७८,२७१ अंकांवर तर निफ्टी ४२ अंकांच्या घसरणीसह २३,६९६ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी १८५ अंकांनी वाढून ५०,३४३ अंकांनी ५०,३४३ अंकांवर निफ्टी मिडकॅप ४५८ अंकांच्या वाढीसह ५४,२७९ अंकांवर, निफ्टी स्मॉलकॅप ३१७ अंकांच्या वाढीसह १७,११५ अंकांवर बंद झाला.निफ्टीमधील हिदाल्कोच्या शेअरमध्ये सर्वाधिक २,९० टक्के वाढ झाली. त्याखालोखाल आयटीसी हॉटेल्समध्ये २.८८ टक्के, ओएनजीसीमध्ये २.७४ टक्के, अपोलो हॉस्पिटलमध्ये २.४४ टक्के आणि बीपीसीएलमध्ये २.१९ टक्के वाढ झाली. तर एशियन पेंटसमध्ये ३.४०, टायटन २.९९ टक्के, नेस्ले इंडियामध्ये २.१७ टक्के, ब्रिटानियामध्ये १.९६ टक्के आणि टाटा कन्झ्युमरमध्ये १.८६ टक्के घसरण झाली.
सेन्सेक्स ३१२ अंकांची आपटी निफ्टीची ४२ अंकांची घसरण
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/share-market-down-2_2024091311773.jpg)