सेन्सेक्स आणि निफ्टीचानव्या विक्रमी उच्चांक

मुंबई – जागतिक सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत वाढत्या गुंतवणुकीमुळे आजच्या सत्रात सेन्सेक्सने ८५,९३० चा नव्या विक्रमी उच्चांक गाठला. तर निफ्टीने प्रथम २६,२५० चा सर्वकालिक उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स ६६६ अंकांनी वाढून ८५,८३६ वर बंद झाला. निफ्टी २११ अंकांनी वाढून २६,२१६ वर स्थिरावला.शेअर बाजारातील आजच्या वाढीला ऑटो आणि आयटी शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळाला. क्षेत्रीय निर्देशांकात मेटल आणि ऑटो २ टक्क्यांपर्यंत वाढले. एफएमसीजी, पीएसयू बॅंक प्रत्येकी १ टक्के वाढले. तर कॅपिटल गुड्सच्या निर्देशांकात घसरण झाली. मारुतीचा शेअर्स सर्वाधिक ४.७ टक्क्यांनी वाढला. त्यासोबत बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया या शेअर्सही तेजीत राहिले. तर एलटी, एनटीपीसी हे शेअर्स घसरले.शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.७३ लाख कोटींनी वाढून ४७६.९८ लाख कोटींवर पोहोचले. काल बाजार भांडवल ४७५.२५ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांनी १.७३ लाख कोटींची कमाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top