नवी दिल्ली – लोकसभेतील शून्यकाळ सुरू होण्यापूर्वी ज्या मंत्र्यांची नावे कार्यसूचित होती ते सभागृहात उपस्थित नसल्याने, त्यांच्याऐवजी त्यांच्या खात्याशी संबंधित दस्तावेज संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवल्याने सभापती ओम बिर्ला नाराज झाले. गैरहजर मंत्र्यांच्या कामाशी संबंधित दस्तावेज जर तुम्हीच सदर करणार असाल, तर त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हीच द्या अशा शब्दात त्यांनी मेघवाल यांना फटकारले.
संसदेतील प्र्श्नकाळ संपल्यानंतर त्या दिवसाच्या कार्यसूचित समावेश असलेल्या प्रश्नांशी संबंधित दस्तावेज सभागृहाच्या पटलावर ठेवले जाता . हे काम संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे असते. पण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज उद्योग राज्यमंत्री जितेन प्रसाद हे सभागृहात उपस्थित नव्हते. पण कार्य सूचित त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांच्या खात्याशी संबंधित दस्तावेज ,संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवले. पण सभापतीनी संबंधित खात्याचे मंत्री कुठे आहेत असा सवाल केला. तसेच जे मंत्री गैरहजर असतील त्या सर्व मंत्र्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे तुम्हीच देणार आहात का, असा सवालही सभापतींनी केला. विशेष म्हणजे यावेळी संसदीय कार्य मंत्री किरण रीजीजू हेदेखील सभागृहात उपस्थित होते.सभापतींच्या या नाराजीमुळे सत्ताधारी बाकावरील सदस्यांमध्ये काही काळ अस्वस्थता निर्माण झाली पसरल्याचे दिसत होते.