मुंबई
फाल्गुन पौर्णिमेस अर्थात शुक्रवार १४ मार्च रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
हे ग्रहण लॉस एंजल्स, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, कॅनडा, मेक्सिको, न्यूझिलंड, इजिप्त, पोलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी,लंडन, पॅरिस, नेदरलँड, ग्रीस, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांमध्ये दिसेल. लंडन, पॅरिस येथे हे चंद्रग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. लॅास एंजल्स, न्यूयॉर्क, टोरंटो, शिकागो, वॉशिंग्टन डीसी येथे हे ग्रहण खग्रास स्वरूपात दृश्यमान होईल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा प्रारंभ शुक्रवारी १४ मार्चला सकाळी १०.४० वाजता असून ग्रहणमध्य दु. १२.२९
वाजता व मोक्ष दु. २.१८ वाजता आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम भारतातील लोकांनी पाळू नयेत असे तज्ज्ञांचे मत आहे.