नवी दिल्ली – टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानांनी आज शेवटची उड्डाणे केली. उद्यापासून विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनकरण होणार असून त्यानंतर देशात एअर इंडिया या एकाच कंपनीकडूनच ही उड्डाणे संचलित केली जाणार आहेत. या विलीनीकरणामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात व सेवेत वाढ होणार आहे.एअर इंडिया ही देशातील पहिली विमानकंपनी होती. १९३२ सालापासून सेवा देणाऱ्या या कंपनीचे नंतर राष्ट्रीयकरण झाले. २०१३ साली टाटा ग्रुपने विस्तारा एअर लाईन्स या कंपनीची स्थापना केली. सरकारच्या ताब्यात असलेल्या एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर टाटाने ही सेवा विकत घेतली. एकाच वेळेस दोन दोन विमानकंपन्या चालवणे कठीण होत गेल्यानंतर २०२२ मध्ये विस्ताराचे एअर इंडियाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. १२ नोव्हेंबर पासून ही एकच कंपनी आता विमानसेवा देणार असून आजपासून या सेवेसाठीच्या तिकीटांची विक्रीही एअर इंडियाच्या संकेतस्थळावरुन केली जाणार आहे. यामुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील हिस्सेदारीत पन्नास टक्क्यांनी वाढ होणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |