लखनौ – भारतीय लष्कराबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीसंदर्भात दाखल याचिकेवर लखनौच्या न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले. २०२२ मध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी चीनी सैनिक अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिकांना झोडपून काढत आहेत,अशा आशयाचे विधान केले होते. त्यावर आक्षेप घेत लखनौच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.सीमा भागातील रस्त्यांची जबाबदारी असलेल्या संस्थेचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी ही याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य भारतीय लष्कराचा अवमान करणारे आहे,असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.न्या. अलोक वर्मा यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने पुढील सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले.
लष्कराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी राहुल गांधींना कोर्टाचे समन्स
