मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला चटक दिले पाहिजेत,असे बोंडे म्हणाले.
राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात देशातील आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागली की काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करील असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करून सत्ताधारी आघाडीतील काही नेते गेले काही दिवस राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जीभ छाटणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती.
राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना भारतातील शिख धर्मियांना कृपाण बाळगण्याची परवानगी देऊ नये,अशा आशयाचे विधान केले होते. त्यावर आक्षेप घेत केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी हे एक नंबरचे दहशतवादी आहेत,असे विधान केले होते.
त्यानंतर आता अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याने आगीत तेल ओतले गेले आहे.काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्र वक्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.