मुंबई – नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात बर्ड फ्ल्यूमुळे तीन वाघ व एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.या प्राणी संग्रहालयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर
भायखळा येथील राणीबाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आता राणीबागेतील वाघोबा, बिबटे,कोल्हा आदी प्राण्यांना दररोज दिले जाणारे चिकन खाद्य पुढील काही दिवस बंद आले आहे,अशी माहिती या प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले की,नागपूर येथील प्राणी संग्रहालयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्यातील अन्य प्राणी संग्रहालयांना खबरदारी घेण्याबाबत अलर्ट जारी केला आहे.नागपूर प्राणी संग्रहालयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने प्राण्यांना चिकन देण्यास बंदी घातली आहे.त्याचप्रमाणे याठिकाणी मांसाहारी प्राण्यांच्या जवळ ऑन ड्युटी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे,जागा सॅनिटायझर करणे अशा नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दरम्यान,राणीबागेतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि येथील महसुल वाढविण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत राणीबागेत नवीन सिंह आणला जाणार आहे.