मॉस्को- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क भागातील ७४ गावे ताब्यात घेतली आहेत.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून जावे लागले आहे.त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. युक्रेनने ६ ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ला केला.१३ ऑगस्टपर्यंत त्यांनी एक हजार चौरस किमी क्षेत्रातील ७४ गावे काबीज केली आहे.न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार,दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाने रशियाच्या हद्दीत घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान,भारताने रशियाच्या बेल्गोरोड, कुर्क आणि ब्रायन्स्क भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी हे भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना दिली आहे.