मुंबई – मुंबई आणि पुण्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकूळ) दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे आता मुंबई आणि पुण्यात गोकुळच्या गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपयेऐवजी ५६ रूपयांनी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणि पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही. दुधापासून बनणारे पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे खर्च आणि तोटा याचा ताळमेळ बसवण्यासाठी गोकुळने दरवाढीचा निर्णय घेतला असल्याचे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी सांगितले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |