नवी दिल्ली – मुंबई- गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या पावसाळ्याच्या आधी पूर्ण करणार,अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे काल माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांची ४२ वी बैठक गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल भारत मंडपम येथे पार पडली. त्यानंतर गडकरी प्रसार माध्यमांशी बोलत होते.याप्रसंगी गडकरी यांनी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर ७ दिवस उपचार किंवा दीड लाखांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे,असे गडकरी यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्ग जूनपूर्वी पूर्ण करणार
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/mumbai-goa-expess.jpg)