मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा १०० किमीचा टप्पा पूर्ण

अहमदाबाद – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा १०० किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करीत आहे. बुलेट ट्रेनच्या १०० किमीपेक्षा जास्त लांब मार्गिकेवर २०,००० पेक्षा अधिक नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत, अशी माहिती एनएचएसआरसीएल कंपनीने दिली आहे.

बुलेट ट्रेन आपल्या वायुवेगाने धावते. तेव्हा ट्रेनचा वेग आणि वातावरणातील हवा यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. तेव्हा वाढत्या वेगामुळे प्रचंड आवाज होतो. या आवाजामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो. बुलेट ट्रेन धावत असताना प्रवाशांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ट्रेनच्या मार्गिकेवर नॉइज ब्लॉक्स बसवले जातात. बुलेट ट्रेनच्या मार्गिकेवरही असेच नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत.
मार्गिकेवर दर एका किलोमीटरने हे नॉइज ब्लॉक्स उभारण्यात आले आहेत. ट्रेन आणि ट्रॅक दरम्यान संघर्षामुळे होणारा दाब कमी करण्यासाठी ब्लॉक्समध्ये काँक्रीट पॅनल आहेत. हे पॅनल २ मीटर लांब तर १ मीटर रुंद आहेत. ८३०-८४० किलो इतके एका पॅनलचे वजन आहे. काही भागांमध्ये ३ मीटरचे पॅनल बांधले गेले आहेत. हे नॉइज ब्लॉक्स तयार करण्यासाठी सहा विविध ठिकाणी कारखाने सुरु करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top