नागपूर- विधानसभा निवडणुकांनंतर बऱ्याच कालावधीनंतर काल मंत्रीमंडळाने शपथ घेतली. मात्र महायुतीत २१ चेहऱ्यांना नव्याने स्थान मिळाले. यात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री दीपक केसरकर नाराज असल्याची चर्चा होती . यावर केसरकर म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे नाराजी दिसत आहे का? मी नाराज नाही. नव्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघा. आम्ही उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. आपण आनंदी राहिले पाहिजे . त्यांच्या बरोबर राहिले पाहिजे. नाराज असलेल्या आमदारांवर ते म्हणाले की, नाराजी असलेल्यांनी संयम ठेवला पाहिजे. गोगावले यांच्याकडे बघा, अडीच वर्षे त्यांनी वाट पाहिली. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. यावर ते म्हणाले की, ही महाराष्ट्राची भूमी आहे, साई बाबांची भूमी आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |