मिझोरममध्ये जन्मले पहिले’जनरेशन बिटा’बाळ

ऐझवाल – देशातील पहिले जनरेशन बिटा बाळ मिझोरम राज्यात जन्मले आहे. १ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी या बाळाचा जन्म झाला. १ जानेवारी २०२५ पासून सन २०३९ या कालावधीत जन्मणाऱ्या जन्मणाऱ्या मुलांना जनरेशन बिटा पिढीतील मुले म्हटले जात आहे.मिझेरममध्ये जन्मलेले हा मुलगा देशातील पहिले जनरेशन बिटा मूल ठरले आहे.फ्रँकी रेमरुआत्दिका झाडेंग असे या मुलाचे नाव आहे. ऑल इंडिया रेडिओने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऐझवालच्या दुर्तलांगमधील सीनोड हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या या बाळाचे वजन ३ किलो १२ ग्रॅम असून ते पूर्णपणे सुदृढ आहे. कोणत्याही गुंतागुंतीविना या बाळाचा जन्म झाला आहे.बिटा पिढीतील पहिल्या बाळाचा आपल्या राज्यात जन्म झाल्याने मिझोरमचे नागरिक अत्यंत आनंदी आहेत. सर्वत्र जल्लोषात या मुलाच्या आगमनाचे स्वागत केले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top