माजी मुख्यमंत्र्याने डोंगर कापून आलिशान संगमरवरी बंगला

हैदराबाद – हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सध्या डोंगरात बांधलेल्या आलिशान बंगल्यामुळे वादात सापडले आहेत. विशाखापट्टणमच्या ऋषिकोंडा येथे समुद्रालगत असलेल्या डोंगरात कडेकपारी कापून बंगला बांधण्यासाठी पुरेशी जागा तयार करण्यात आली.
बंगल्यासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दहा एकरचा भूखंड तयार करण्यात आला. त्यावर पांढऱ्या-शुभ्र संगमरवराचा भलामोठा बंगला बांधण्यात आला आहे. यावर सुमारे ५०० कोटी रुपये उधळण्यात आल्याची चर्चा आहे.
एका वृत्तसंस्थेने या बंगल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.बंगल्यातील फर्निचर आणि मोठे झुंबर आकर्षक आहेत. बंगल्यात सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.बंगल्याबाहेर बाग आहे. राज्यात वायएसआर काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री रेड्डी यांचे हे निवासस्थान आणि कार्यालय होते. या बंगल्यासाठी रेड्डी यांनी सरकारी पैशाचा अपहार केला असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top