प्रयागराज – महाकुंभ मेळाव्यात तिसऱ्यांदा आगीची घटना घडली. शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-१८ मध्ये आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत एक मंडप जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने १० मिनिटात आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यापूर्वी महाकुंभ मेळाव्यात १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये सिलेंडरमधील गळतीमुळे आग लागली होती. यात दीडशेहून अधिक तंबू जळून खाक झाले होते. ३० जानेवारीला छतनाग घाटाजवळील नागेश्वर घाट सेक्टर २२ मध्ये आग लागली होती. त्यात १२ हून अधिक तंबू जळून खाक झाले होते.
महाकुंभात तिसऱ्यांदा आग एक मंडप जळून खाक
