प्रयागराज – प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभाचे हवाई दर्शन घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. यासाठी दोन हेलिकॉप्टरची सेवा देण्यात आली आहे. केवळ १२९६ रुपयांमध्ये पर्यटक या हेलिकॉप्टरमधून ८ मिनिटे महाकुंभाचे हवाई दर्शन घेऊ शकतील .उत्तर प्रदेशच्या इको टुरिझम द्वारे ही सेवा देण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टर कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. याची चाचणीही घेण्यात आली असून लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. महाकुंभ नगरच्या बोट क्लबपासून हे हेलिकॉप्टर उडणार असून प्रवाशांना आठ मिनिटे हवाई दर्शन घेता येईल . महाकुंभात एक हेलिकॉप्टर सेवा देत असून लवकरच दुसरे हेलिकॉप्टरही पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
महाकुंभाच्या हवाई दर्शनासाठी विशेष हेलिकॉप्टर सेवा
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/helicopter-service-star-in-kumbh-mela.jpg)