मल्याळम अभिनेतानिर्मल बेनीचे निधन

तिरुवनंतपुरम – अभिनेता निर्मल बेनीचे आज तिरुवनंतपुरम येथील त्याच्या राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली. या बाबतची माहिती त्याचा मित्र आणि निर्माता संजय पडियूरने सोशल मीडियावर दिली.संजय पडियूरने फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले की, ‘मी प्रेमळ मित्र निर्मल बेनीला अलविदा करतो. ईश्वराकडे प्रार्थना आहे की, माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती मिळो.’ दरम्यान, ‘आमीन’मधील कोचाचनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २०१२ मध्ये त्याने आपल्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. केवळ ५ चित्रपटात तो करू शकला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top