मराठवाड्यातील ५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजीनगर- मराठवाड्यातील घरगुती, व्यापारी, उद्योग, शेती पाणीपुरवठा अशा ५०६५ वीजधारकांकडे १७ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी असल्याने या ग्राहकांचा वीजपुवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिली.

राहुल गुप्ता यांनी महावितरण प्रादेशिक कार्यालयांच्या छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड परिमंडलातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत घरगुती,व्यापारी व उद्योग क्षेत्रातील ग्राहकांकडील थकबाकी, एप्रिल २०२४ पासून बिले न भरणाऱ्या ग्राहकांकडील थकबाकी, वीज जोडणी घेतल्यापासून बिले न भरणारे ग्राहकांकडे असलेली थकबाकी, कायमस्वरूपी खंडित ग्राहकांकडे असलेली थकबाकी, उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, मराठवाड्यात वीज जोडणी केल्यापासून ५३,७७४ वीज ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नाही.त्यांच्याकडे ७० हजार लाख २८ हजार रुपये थकबाकी आहे.त्यामुळे या थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकी न भरता परस्पर वीजपुरवठा जोडणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत. वीजपुरवठा खंडित केला तरी वीजबिल भरून ते पूर्ववत करून घेण्याचे आवाहन राहुल गुप्ता यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top