भोपाळ – मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील हरेता सानी गावाजवळ आज दुपारी हवाई दलाचे लढाऊ मिराज-२००० विमान शेतात कोसळताच जळून खाक झाले. विमानाचे दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. या घटनेनंतर हवाई दलाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले.ग्वाल्हेरहून नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केले होते.त्यानंतर शिवपुरी जिल्ह्यात हवेत असताना या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान थेट शेतात कोसळले.त्यापूर्वी दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून बाहेर पडले.या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पायलटला ग्वाल्हेरला घेऊन गेले.या घटनेनंतर जखमी पायलटचा एक फोटोही व्हायरल झाला. ज्यामध्ये तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे.
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
