मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण तापले असताना आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मुंबईत भेट घेतली. त्यांच्यात २० मिनिटे झाली. कुणाल दराडे हे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.
छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार फिल्डिंग लावली आहे. महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ आपल्या गटाला मिळण्यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार गटालाच मिळाल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे. ते या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत.