बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातील रहिवाशांचे लवकर पुनर्वसन करा

  • हायकोर्टांचे निर्देश

मुंबई- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पुनर्वसन वेळेत करून हा प्रश्न लवकर मार्गी लावा,असे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनासाठी रहिवाशांच्यावतीने सम्यक जनहित सेवा संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.त्यावेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने वेळेत तोडगा काढण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.त्यानंतर सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. त्याआधी सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की,हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी गेल्यावर्षीच वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top