बद्रीनाथ – चारधाममधील एक असलेल्या बद्रीनाथमध्ये सध्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेला पुण्यातील ५२ जणांचा एक ग्रुप तीन दिवसांपासून तिथे अडकला आहे. हेमकुंड आणि बद्रीनाथ धाम येथून परतणारे ८००हून अधिक भाविक जोशीमठ गोविंदघाट येथे अडकले आहेत. तर २,२०० प्रवासी हेलंग, पिपळकोटी, बिर्ही, चमोली आदी थांब्यांवर थांबले होते. पुणे शहरातील 52 ८ तारखेपासून गोविंद घाटाजवळ अडकून पडले आहेत. परंतु त्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला आहे.
चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर आणि पातलगंगा भागात भूस्खलन झाले आहे. पातालगंगाकडून रस्ता सुरु झाला आहे. परंतु जोशीमठजवळ भूस्खलन झालेला रस्त्यावरील ढिगारे काढताना अनेक अडचणी येत आहेत. कामगार काम करत असताना पुन्हा भूस्खलन होत आहे. ४८ तासांनंतरही हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. या भूस्खलनामुळे बद्रीनाथ, जोशीमठ, नीती, माणा, तपोवन, मलारी, लता ,रैणी, पांडुकेश्वर, हेमकुंड साहिब आदी भागाशी संपर्क तुटला आहे. बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन रस्ते सुरु करण्याचे प्रयत्न करत आहे.
उत्तराखंडमधील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे उत्तराखंडमधील२६० मार्ग बंद आहेत. चारधाम यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अडकलेले भाविक मार्ग सुरु होण्याची प्रतीक्षा करत आहेत.