मुंबई – मुंबई उपनगरी रेल्वे प्रशासनासाठी विनातिकीट प्रवासी ही एक नेहमीची डोकेदुखी राहिली आहे. या फुकट्या प्रवाशांना आवर घालण्यासाठी आता विनातिकीट प्रवासी ज्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करताना आढळेल त्या डब्याच्या दर्जानुसार दंडाची रक्कम वसूल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
नव्या प्रस्तावानुसार दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करताना आढळणाऱ्या विनातिकीट प्रवाशाला २५० रुपये, पहिल्या दर्जाच्या डब्यासाठी ७५० रुपये आणि वातानुकुलित गाडीसाठी १ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या सर्वदर्जाच्या डब्यांसाठी दंडाची रक्कम २५० रूपये आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले.