अव्वल मानांकित बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याच्यासमोर जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) नमते घेतल्याने आज कार्लसन जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत परतला.गेल्या शुक्रवारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपीड फेरीतील सामना खेळताना कार्लसन जीन्स पँट परिधान करून आला होता. त्यामुळे पंचांनी त्याला हे ड्रेसकोडचे उल्लंघन असल्याचे सांगत जीन्स बदलून येण्यास सांगितले. कार्लसनने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला २०० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या कार्लसन याने स्पर्धेवरच बहिष्कार टाकला.त्याच्यासारखा जागतिक कीर्तिचा खेळाडू खेळणार नसल्याने बुद्धिबळ विश्वात प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली. याची दखल घेत फिडेने ड्रेसकोड शिथिल करीत कार्लसनला जीन्स परिधान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे कार्लसन सोमवारपासून सुरू झालेल्या ब्लिट्झ फेरीत सहभागी झाला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |