प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन

सॅन फ्रान्सिस्को – जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे आज वयाच्या 73 वर्षी निधन झाले. त्यांना रक्तदाबाशी संबंधित समस्या झाल्यानंतर अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी होते. तेही प्रसिद्ध तबलावादक होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top