खेड – मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी ठरणारे दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.सध्या दुसऱ्या बोगद्यात पंखे बसविण्याचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील भोगावनजीक एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. बोगद्यांमधील विद्युतीकरणासह अन्य प्रलंबित कामे प्रगतीपथावर आहेत.मुंबई-गोवा महामार्गावर सर्वात अवघड व धोकादायक असलेला कशेडी घाट अवजड वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र चौपदीकरणाच्या कामात या घाटाला सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत.सध्या पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजुंकडील वाहतूक सुरू आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कशेडीतील बोगदे खुले होणार
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/kasheti-bogda_2025011367513.jpg)