पुणे- सध्या पुण्यातून २ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.मात्र येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या सेवेमध्ये आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस दाखल होणार आहेत.प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यातच रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत घोषणा केली होती.या घोषणेनंतर पुण्यातील एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ६ होईल. या नव्या ४ वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आणखी ४ नवी शहरे पुण्याच्या जवळ येणार आहेत.पुण्यामध्ये सध्या पुणे-हुबळी,
पुणे-कोल्हापूर या २ वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. आता लवकरच पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या मार्गांवरही वंदे भारत एक्स्प्रेस या चार गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या नेमक्या
कधीपासून सुरू होतील. याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.पण ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.