नवी मुंबई-पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या खारघरच्या पांडव कडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या धबधब्यासह खारघरमधील तलाव परिसरातही पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे,अशी माहिती पनवेल विभाग वन परिक्षेत्र अधिकारी डी.एस. सोनवणे यांनी दिली.
पुणे येथील भुशी धरणाजवळ झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार,पांडवकडा धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये,यासाठी वन विभागाकडून २ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.तसेच खारघर पोलिसांकडून पांडव कडा धबधबा आणि तलाव परिसरात पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पोलिसांकडून याठिकाणी तसे मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत.