पन्ना – जागतिक हिरे व्यापारात महत्त्वाचे केंद्र असलेल्या पन्ना येथील हिऱ्यांच्या विक्रीत सलग तीन वर्षे घट होत असून यंदा यात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे हिऱ्यांच्या किंमतीतही घट झाली असून अनेक हिरे विक्रीविना पडून आहेत. जागतिक पातळीवरील युद्धजन्य स्थिती व प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांच्या वापरात झालेली वाढ यामुळे विक्रीत घट झाली आहे.पन्नामधील हिऱ्यांची विक्री करण्यात मोठी अडचण येत असून सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या हिरे कार्यालयातही अनेक हिरे विक्रीविना पडून आहेत. या कार्यालयाने या वर्षी केलेल्या लिलावानंतरही ६४ हिरे पडून असून गेल्या वर्षी १३९ तर त्या आधी ६८ हिरे विकले गेले नव्हते. हिरे व्यापारी या लिलावातून हिरे खरेदी करुन नंतर त्यांची खुल्या बाजारात विक्री करत असतात. पन्ना येथील हिरे व्यापार अतिशय अडचणीत असून सध्या हिरे विकणे कठीण झाले आहेत. जगातील अनेक देशांमधील युद्धे, शितयुद्धे व तणावामुळे या हिरे विक्रीत घट झाली आहे. पन्ना येथील खाणीतून निघणाऱ्या हिऱ्यांना अमेरिका, इस्रायल व रशियामध्ये मोठी मागणी असते. पन्नामधील हिऱ्यांना सुरत इथे पैलू पाडून या देशांमध्ये पाठवले जात असते. परदेशातून प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या हिऱ्यांचीही मागणी वाढली आहे. नैसर्गिक हिऱ्यांची किंमत कॅरेटमागे दोन ते तीन लाख रुपये असतांना या कृत्रिम हिऱ्यांची किमत केवळ पंधरा ते वीस हजार रुपये असते. कृत्रिम दागिण्यांमध्ये या हिऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यानेही नैसर्गिक हिऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून विक्री कमी झाल्यामुळे हिऱ्यांच्या किंमतीतही घट झाली आहे. हिऱ्यांची किंमत सध्या ऐतिहासिक निचांकी पातळीवर आली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |