पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसरशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले.”रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळे भारताला या राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पोस्ट केले.मोदी हे सकाळी १०.५५ वाजता हवाई दलाच्या विशेष विमानाने मॉस्कोला निघाले .सायंकाळी 5:20 वाजता नुकोव्हो-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्यादरम्यान भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० ते ११.३० दरम्यान खाजगी बैठक आणि भोजनाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान मोदी रशियात होणाऱ्या 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. वार्षिक शिखर परिषदेमुळे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना संरक्षण, व्यापार , गुंतवणूक , ऊर्जा , सहकार्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाण-घेवाण यासह द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेता येणार आहे. रशियाच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमान सुखोई 57 वरही यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे.रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांशी संवाद साधतील. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पंतप्रधानांच्या मॉस्को भेटीची सर्वांना उत्सुकता आहे. २० जुलैला मोदी हे ऑस्ट्रियाला रवाना होतील.पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीत भारत आणि रशिया यांच्यातील संबंध सुधारले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काही वर्षांपूर्वी दोन्ही देशांत सर्व प्रकारचे संबंध सुमधुर होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या कालावधीतील १० वर्षांत १६ वेळा रशियाला गेले. तितक्याच कालावधीतील मोदी यांची ही ११वी रशिया भेट आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे दोन्ही देशातील संबंधांत थोडा दुरावा निर्माण झाला. आताच्या दौऱ्याने भारत आणि रशियामधील संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top