लंडन – जग अण्वस्त्रमुक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निहोन हिडांक्यो या जपानच्या संस्थेला रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. निहोन हिदांक्यो या जपानी संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगात अण्वस्त्रांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा म्हणतात.
हे हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.