वॉशिंग्टन- अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले मार्स मिशन ६ जुलैच्या शनिवारी पूर्ण झाले. ‘नासा’च्या मंगळ मोहिमेतील चार शास्त्रज्ञ हे वर्षभराच्या वास्तव्यानंतर त्यांच्या यानातून नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत. या यानात मंगळासारखे वातावरण तयार करण्यात आले होते.
या मोहिमेतील चार शास्त्रज्ञांची नावे केली हॅस्टन,आन्का सेलारिऊ,रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स अशी आहेत.या मोहिमेतील यानाने पृथ्वीवरून उड्डाणच घेतले नव्हते,तर ‘नासा’ने ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळाच्या वातावरणासारखीच एक राहण्यासाठी जागा तयार केली होती. १२ महिन्यांहून अधिक काळ बाहेरील जगापासून विभक्त राहिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे चार शास्त्रज्ञ पृथ्वीवर परतले.भविष्यात मंगळावर मोहीम पाठवताना येणार्या आव्हानांना तोंड देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.या शास्त्रज्ञांची त्याठिकाणी स्पेस वॉक म्हणजेच ‘मार्सवॉक’देखील केले.याशिवाय त्यांना त्या ठिकाणी भाजीपालाही पिकवला.
या चौघांनी २५ जून २०२३ रोजी ३ डी-प्रिंडेट राहण्याची सोय असलेल्या या कक्षेत प्रवेश केला.मिशनचे फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी जोन्स म्हणाले की,बंदिवासात असलेल्या शास्त्रज्ञांनी ३७८ दिवस वेगवेगळे संशोधन केले.हे चार वैज्ञानिक मंगळ ग्रहासारख्या वातावरणात १,७०० चौरस फूट जागेत राहत होते. भविष्यात मंगळावरील संभाव्य आव्हाने कशी असतील, याचा अनुभव त्यांनी घेतला. या आव्हानांमध्ये मर्यादित संसाधने, लोकांपासून वेगळे राहणे आणि पृथ्वीशी संपर्कात २२ मिनिटांचा विलंब यांचा समावेश होता. अशा आणखी दोन मोहिमा आखण्यात आल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.