नागपूर हिट अँड रन प्रकरण! रितिका मालुची सुटका

नागपूर- नागपुरमधील हिट अँड रन प्रकरणात महिला आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटक बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले. २४ फेब्रुवारीच्या रात्री नागपूरमध्ये ही घटना घडली होती. मध्यरात्री क्लबमधून घरी जाताना भरधाव मर्सिडिज कारने दोन तरुणांना चिरडले होते. यात हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारचालक महिला रितिका मालूवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात झाल्यापासून रितिका मालू फरार होती. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दरम्यान, १ जुलै रोजी रितिका मालूने आत्मसमर्पन केले होते. त्यानंतर काल तिची न्यायालयाने सुटका केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटक बेकायदेशीर ठरवली आणि ताशेरे ओढले. या प्रकरणात कलमवाढ करण्याअगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने रितिका मालूची सुटका केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top