मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना तत्काळ त्यांचे थकित वेतन देण्यात यावे,अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड.प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,”कोणत्याही कारणामुळे चार महिने वेतन न देणे हे गंभीर कृत्य आहे. त्यामुळे या नवनियुक्त परिचारिकांना त्यांच्या हक्काचे चार महिन्याचे थकित वेतन द्यावे.चार महिन्यांपूर्वी पालिकेने आपल्या विविध रूग्णालयात ६०० परिचारिकांची नव्याने नियुक्ती केली आहे.पण या परिचारिका आपल्या चार महिन्याच्या पगारापासून वंचित आहेत.