मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यास भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी ऐनवेळी नकार देत माघार घेतली .
निरेश राणे यांना मालिवणी पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते. पत्रकारांसमोर बोलताना ते म्हणाले होते की आपण कितीही वेळा जबाब देण्यास तयार आहोत.
मात्र , काल सोशल मीडियावर पोस्ट करून जबाब नोंदवून घेणार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या निष्पक्षपातीपणावर संशय घेत त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे टाळले.आपली भूमिका स्पष्ट करताना नितेश यांनी एक्सवर पोस्ट करीत म्हटले की जो अधिकारी माझा जबाब नोंदवून घेणार आहे त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी या कामासाठी नेमावा,अशी मागणी मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.मला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे वागणे संशयास्पद आहे असे मला वाटले म्हणून मी जबाब नोंदविण्यासाठी गेलो नाही’. नितेश राणे यांनी दिशा सालीयान प्रकरणात सतत आदित्य ठाकरे यांना ओढण्याचा प्रयत्न केला . आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात संबंध आहे याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे अनेकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले आणि ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला . मात्र आज प्रत्यक्ष पुरावे देऊन साक्ष देण्याची वेळ आल्यावर त्यांनी माघार घेतली आहे .