दिल्लीवर दाट धुक्याचे आवरणविमान रेल्वे वाहतूक विलंबाने

नवी दिल्ली – उत्तर भारतात सध्या सुरु असलेल्या थंडीच्या लाटेमुळे राजधानी दिल्लीवर धुक्याची दाट चादर पसरली आहे. त्यामुळे विमान वाहतूक व रेल्वे वाहतूकीला विलंब झाला असून रस्त्यांवरील वाहतूकही धीम्या गतीने होत आहे.दिल्लीत सध्या थंडीचा कहर सुरु असून दाट धुक्यामुळे दृश्यमान्यता कमी झाली आहे. नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन या रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे. अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज अनेक रेल्वे गाड्यांना सात ते आठ तासांचा विलंब झाला. हवामान विभागाने थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून थंडीमुळे विमानसेवाही बाधित झाली. अनेक विमानांना होत असलेल्या विलंबामुळे दिल्ली विमानतळ प्रधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राजधानीतील शीतलहरीचा परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावरही झाला आहे. दिल्लीमध्ये काल ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top