नवी दिल्ली- प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली लागू करा, अशी मागणी रोहिणी मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपा आमदार विजेंदर गुप्ता यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे पत्राद्वारे केली.
उपराज्यपालांना दिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये पंतप्रधान आयुष्मान भारत स्वास्थ्य योजना सुरू केली होती. ही योजना देशभरात यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. परंतु दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे ही योजना लागू होऊ शकली नाही. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने दिल्लीसाठी २,४०६ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले होते, ज्याअंतर्गत १,१३९ शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रे, ११ जिल्हा एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि ९ क्रिटिकल केअर ब्लॉक्स स्थापन करायचे होते. मात्र आम आदमी पक्षाच्या कुशासनात दिल्लीतील आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत. रुग्णालयांची स्थिती सुधारण्याऐवजी केजरीवाल सरकारने केवळ खोट्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले. दिल्लीतील लोकांना ज्या आरोग्य सुधारणांची अपेक्षा होती ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. आता दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सरकार येताच या योजना राबवणे आवश्यक आहे.